माजी आ. साठेंच्या गाडीला अपघात : प्रकृती स्थिर

अंबाजोगाई : केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. पृथ्वीराज साठे हे केज – बीड या रस्त्यावरून एका विवाह सोहळ्यासाठी जात असताना टाकळी पाटी या ठिकाणी एका दुचाकी चालकास वाचवत असताना त्यांची गाडी पलटी झाली. यावेळी गाडीत माजी आमदार साठे, प्रल्हाद वळे, भिमराव तुपे व चालक महेश हे चौघे प्रवास करत होते.

गाडी पलटी झाल्यानंतर हाताला मार लागलेला असतानाही विवाहस्थळी उपस्थित राहून वधुवरांना शुभाशिर्वाद देऊन साठे ‘स्वाराती’ त अधिक उपचारासाठी दाखल झाले.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर एक्सरे व सिटीस्कॅन केले असता काळजी करण्याचे कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या त्यांना पुढील उपचारासाठी नर्सिंग रुम येथे दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.