राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम : मराठवाड्यातही वाढेल गारठा

मुंबई : राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली आहे. पुढील दोन दिवस राज्यात थंडीचा कडाका अजून कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमान 10 अंशाखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवलं गेलं आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात घट राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांच्या तापमानात कमालीची घट पाहायला मिळाली आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात थंडीची लाट आली आहे. कमाल तापमानात घट दिसणार मात्र किमान तापमानात कोणताही बदल होणार नाही. पुढील 2 दिवस राज्यात शीत लहर कायम राहणार आहे. कमाल आणि किमान तापमानात घट होऊ शकते. दिवसभर वातावरणात गारवा राहू शकतो. 

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीडमधील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस खाली राहणार आहे. यंदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अवघं वातावरण ढवळून काढले आहे.