मंडप असोसिएशनची मागणी
अंबाजोगाई : ऑल इंडिया टेंट डीलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशनद्वारा आज 25 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी सरकारच्या नवीन 50 लोकांच्या नियमविरोधात आणि क्षमतेच्या 50 टक्के परवानगी देण्यात यावी, असे निवेदन देण्यात आले.
याच अनुषंगाने अंबाजोगाई तालुक्यातील व्यावसायिक बंधूंनी आज आमदार नमिता मुंदडा, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून असोसिएशनमार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी अंबाजोगाई असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय सावरे, तालुका उपाध्यक्ष अशोक बलूतकर, तालुका सचिव राजैभाऊ कोंबडे, तालुका सहसचिव संजय ढगे, कोषाध्यक्ष हर्षवर्धन वडमारे, जमिलभाई शेख, प्रमुख सल्लागार महेश्वर चिल्लरगे, सहकोषाध्यक्ष नंदकुमार सातपुते, गजानन मुडेगावकर, कमलाकर गुजर हे उपस्थित होते. अंबाजोगाई तालुक्यातील सर्व उपस्थित व्यावसायिकांची नावं, मोबाईल नंबर आणि सही घेऊन तहसील कार्यालयाला हे निवेदन देण्यात आले.