दिवाळीपूर्वी 5 हजार मदतीची घोषणा ; मात्र सर्वच शेतकरी पात्र ठरणार नाहीत…!

टीम AM : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी 5 हजार रुपये अग्रीम मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, ही मदत सरसकट सर्वांना मिळणार नसून, काही शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

कोणत्या शेतकऱ्यांना 5 हजार रुपये मिळणार नाहीत ?

▪️आयकर भरणारे शेतकरी.

▪️शासकीय कर्मचारी असलेले शेतकरी.

▪️लोकप्रतिनिधी असलेले शेतकरी.(या प्रवर्गातील लोकांना 5 हजार रुपयांच्या दुष्काळ मदतीचा लाभ मिळणार नाही.

नव्या तालुक्यांचा समावेश

दुष्काळी तालुक्यांच्या यादीत रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी काही तालुक्यांचा समावेश केला जाणार असून, त्याचा अहवाल लवकरच येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here