CJP आंदोलनावरील निर्बंध भोवले ; दिल्ली पोलिसांची न्यायालयात बिनशर्त माफी…!

टीम AM : दिल्लीतील आंदोलनादरम्यान लादण्यात आलेल्या निर्बंधांवरून दिल्ली पोलिसांना न्यायालयात माफी मागावी लागली आहे. 10 ऑक्टोबर रोजी CJP च्या आंदोलनावेळी राजधानीत अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानंतरही हे निर्बंध कायम असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. आता या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी शपथपत्र दाखल करत बिनशर्त माफी मागितली आहे.

‘जाणूनबुजून आदेशाचं उल्लंघन नाही’

शैलेश मणि त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर दिल्ली पोलिसांनी न्यायालयात आपली भूमिका मांडली. पोलिसांनी बिनशर्त माफी मागत, न्यायालयाचा अवमान करण्याचा किंवा आदेशाचं जाणूनबुजून उल्लंघन करण्याचा हेतू नव्हता, असं स्पष्ट केलं. सार्वजनिक व्यवस्था कायम राखण्यासाठी काही पावलं उचलणं आवश्यक होतं, असं स्पष्टीकरणही पोलिसांनी दिलं.

या प्रकरणातील माफीमुळे अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील CJP साठी हा महत्त्वाचा विजय असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, न्यायालयाने या प्रकरणात पुढे काय भूमिका घेतली, याकडे लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here