एसटीच्या ‘स्मार्टकार्ड’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद : 1 कोटीहून अधिक प्रवाशांची नोंदणी…!

टीम AM : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांचा प्रवास सुलभ करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘एनसीएमसी’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्टकार्डला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत राज्यात तब्बल 1 कोटी 1 लाख 73 हजार 838 प्रवाशांनी या कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 64 लाख 91 हजार 65 कार्डे सक्रिय झाली आहेत.

‘एनसीएमसी’ स्मार्टकार्डच्या माध्यमातून एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार अधिक सुलभ आणि कॅशलेस करण्याच्या दिशेने महामंडळाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना ‘एनसीएमसी’ स्मार्टकार्डचे वाटप करण्यात येत आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एनसीएमसी’ स्मार्टकार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ‘एनसीएमसी’ स्मार्टकार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. प्रवाशांना ‘एनसीएमसी’ स्मार्टकार्ड अधिकृत एसटी आगार, बसस्थानक तसेच अधिकृत एजंट नेटवर्कच्या माध्यमातून मिळविता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here