अंबाजोगाई तालुक्यातील कोदरी शिवारात हिंस्र प्राण्याचा धुमाकूळ : एकाच रात्री 14 शेळ्या ठार

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील कोदरी शिवारात हिंस्र प्राण्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुपालक शेतकरी आबासाहेब पोटभरे यांच्या शेळीपालन शेडमध्ये घुसून अज्ञात हिंस्र प्राण्याने लोखंडी जाळी तोडत एकाच रात्री तब्बल 14 शेळ्यांचा फडशा पाडला. या घटनेत पोटभरे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत शेळ्यांची तपासणी केली असून, नेमका कोणत्या हिंस्र प्राण्याने हा हल्ला केला याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, रात्रीच्या वेळी जनावरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. संबंधित हिंस्र प्राण्याचा शोध घेऊन तातडीने बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here