रुग्णांना दिलासा : खासगी रुग्णालयांत ‘रेट चार्ट’ बंधनकारक, वाचा…!

टीम AM : राज्यातील खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला आणि अवाजवी बिल आकारणीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांनी आपल्या आवारात उपचारांचे दरफलक (Rate Chart) लावणे आता बंधनकारक करण्यात आले असून, त्यानुसारच रुग्णांना देयके द्यावीत, असे आदेश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिले.

विशेषतः ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने’ चा लाभ घेणाऱ्या गरीब रुग्णांकडून नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त शुल्क उकळणाऱ्या रुग्णालयांची गय केली जाणार नाही. अशा दोषी रुग्णालयांवर केवळ दंडात्मक कारवाईच होणार नाही, तर त्यांना थेट ब्लॅकलिस्ट (काळ्या यादीत) टाकण्यात येईल, असा कडक इशारा मंत्र्यांनी दिला असून यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here