जीवनाशी झुंज अपयशी : डॉ. ममता राठी यांचे निधन…!

टीम AM : अंबाजोगाई येथील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. ममता शामसुंदर जखोटिया (राठी) यांचे दीर्घ उपचारानंतर निधन झाले. तब्बल 74 दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. मात्र, अखेर गुढीपाडव्याच्या रात्री लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

4 जानेवारी रोजी झालेल्या दुर्घटनेत त्या गंभीररीत्या, सुमारे 85 टक्के भाजल्या होत्या. त्यानंतर त्यांना तत्काळ लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला उपचारांना प्रतिसाद मिळत असला तरी मागील काही दिवसांत त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर त्यांचे निधन झाले.

वाणिज्य विषयात ‘पीएच.डी.’ मिळवलेल्या डॉ. राठी या विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होत्या. त्यांच्या अध्यापनशैलीमुळे तसेच यूट्यूबच्या माध्यमातून दिलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here