मुस्लिम समाजाच्या 5% आरक्षणासाठी लोकविकास महाआघाडीचे निवेदन

टीम AM : मुस्लिम समाजाच्या शिक्षण व नोकरीतील 5 टक्के आरक्षण कायम ठेवून ते तात्काळ लागू करावे, तसेच विशेष मागास प्रवर्ग ‘अ’ मधील मुस्लिम समाजाला जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजीचा शासन निर्णय आणि परिपत्रक तात्काळ मागे घ्यावे, या मागण्यांसाठी लोकविकास महाआघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंबाजोगाई येथे आज दिनांक 20‌ फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले.

उपविभागीय अधिकारी दिपक वजाळे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे हे निवेदन पाठविण्यात आले. मुस्लिम समाजाच्या हक्कांसाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी हा पाठपुरावा करण्यात येत असून शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी लोकविकास महाआघाडीच्या वतीने करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, लोकविकास महाआघाडीचे सर्वेसर्वा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया, नगरसेवक बबन लोमटे यांच्यासह आघाडीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here