बीड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून पाहणी

टीम AM : राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकानं काल पाहणी केली. बीड जिल्ह्यात बीड, शिरूर कासार आणि आष्टी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागांचा या पथकानं दौरा केला. 

यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा आढावा घेतला. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 445 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात 11 तालुक्यांमध्ये पिकांसह जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसंच पशुधन आणि घरांनाही मोठा फटका बसला आहे.  त्यामुळे सरसकट नुकसान भरपाईची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.