टीम AM : भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्याही परदेशी संस्थेतून ‘एमबीबीएस’ करण्यासाठी ‘नीट – यूजी’ परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय तो विद्यार्थी परदेशी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाही, असे एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ चा (एमसीआय) याबाबतचा नियम कायम ठेवला. परदेशातून वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ‘नीट-यूजी’ पात्रतेची वैधता सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.
परदेशात वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याने भारतात वैद्यकीय सराव करण्यासाठी आवश्यक मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.