टीम AM : राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघाची चाचपणी केली जात असून प्रत्येक राजकीय पक्ष तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. केज विधानसभा निवडणुकीतही यंदा तगडी लढत पाहायला मिळणार आहे. त्यासाठी ‘महायुती’, महाविकास आघाडी आणि परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे मतदार संघातील जनतेचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे ‘महायुती’ च्या वतीने भाजपच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांची उमेदवारी फिक्स मानली जात असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार ? याचीच चर्चा सर्वत्र दिसून येत आहे. केज विधानसभा मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेही जवळपास 40 संभाव्य उमेदवार निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप या उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, तिकीट याच शिलेदारांना मिळेल असे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. 40 उमेदवारांची यादी असून यामध्ये कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार ? याबाबतची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संभाव्य उमेदवार यादी पुढीलप्रमाणे –
इस्लामपूर – जयंत पाटील
तासगाव कवठे महांकाळ – रोहित पाटील
शिराळा – मानसिंग नाईक
उत्तर कराड – बाळासाहेब पाटील
कोरेगाव – शशिकांत शिंदे
फलटण – दीपक चव्हाण
माण खटाव – प्रभाकर देशमुख
शिरुर – अशोक पवार
जुन्नर – सत्यशील शेरकर
इंदापूर – हर्षवर्धन पाटील
आंबेगाव – देवदत्त निकम
वडगाव शेरी – बापू पठारे
दौंड – रमेश आप्पा थोरात
माळशिरस – उत्तमराव जानकर
कर्जत जामखेड – रोहित पवार
काटोल – अनिल देशमुख
विक्रमगड – सुनील भुसारा
घनसावंगी – राजेश टोपे
बीड – संदीप क्षीरसागर
मुंब्रा – जितेंद्र आव्हाड
जिंतूर – विजय भांबळे
अहेरी – भाग्यश्री अत्राम
सिंदखेड राजा – राजेंद्र शिंगणे
उदगीर – सुधाकर भालेराव
घाटकोपर पूर्व – राखी जाधव
परळी – राजाभाऊ पड
लक्ष्मण पवार – गेवराई
आष्टी – भीमराव धोंडे
केज – पृथ्वीराज साठे
माजलगाव – रमेश आडसकर
राहुरी – प्राजक्त तनपुरे
देवळाली – योगेश घोलप
दिंडोरी – गोकुळ झिरवाळ
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
जामनेर – गुलाबराव देवकर
अकोला – अमित भांगरे
पारनेर – राणी लंके
खानापूर – सदाशिव पाटील
चंदगड – नंदाताई बाभूळकर
इचलकरंजी – मदन कारंडे