राज्यात 108 रुग्णवाहिकांच्या संख्येत दुपटीनं वाढ 

टीम AM : राज्यात 108 रुग्णवाहिकांची संख्या दुपटीनं वाढणार असून, या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका आणि बोट अँब्युलन्सचा नव्यानं समावेश करण्यात आला आहे.

समुद्र आणि नद्यांमध्ये बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता, नव्यानं 36 बोट अँब्युलन्स विविध अपघाती समुद्र किनारे आणि नदी पात्रांमध्ये तैनात होणार आहेत. 

त्याचबरोबर नवजात शिशूंसाठी 25 रुग्णवाहिका नव्यानं येणार आहेत. सध्या 108 सेवेद्वारे 937 रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत असून, या पुढे अशा 1756 रुग्णवाहिका सेवा देणार आहेत.