पाकिस्तानविरोधात शुभमन गिल खेळणार ? : रोहित शर्माने दिली ‘ही’ माहिती

टीम AM : पाकिस्तानविरोधातील सामन्यापूर्वीच भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक वृत्त समोर आले आहे. युवा सलामी फलंदाज शुभमन गिल शनिवारी सामन्यासाठी तंदुरुस्त झाला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने शुभमन गिल याच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.

पाकिस्तानविरोधातील सामन्यासाठी शुभमन गिल 99 टक्के तयार असल्याचे रोहित शर्मा याने सांगितले. पाकिस्तानविरोधातील सामन्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्मा याने शुभमन गिल याच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे. शुभमन गिल खेळण्यासाठी तयार असल्याचे रोहित शर्मा याने सांगितले. डेंग्यू झाल्यामुळे शुभमन गिल विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्याला मुकला होता. पण आता त्याने डेंग्यूवर मात केली आहे. तो लवकरच मैदानावर परतणार आहे. पाकिस्तानविरोधात गिल मैदानात उतरल्यास भारताच्या फलंदाजीची ताकद आणखी वाढणार आहे.