टीम AM : विधीमंडळाच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर आहे.
कॉंग्रेसच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आज संध्याकाळी विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. चव्हाण यांच्यासोबतच नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचंही नाव चर्चेत आहे.
उद्यापासून 4 ऑगस्टपर्यंत पावसाळी अधिवेशन होणार आहे. या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांचा चहापान कार्यक्रम आहे. मात्र, या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. हे सरकार शेतकरी विरोधी, कलंकित सरकार असल्याची टीका अंबादास दानवेंनी केली.
राज्यात सध्याचं राजकारण संतापजनक आणि घाणेरडं सुरू आहे. लोक याला संतापले असून, सत्तेसाठी स्वार्थाचं राजकारण सुरू आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.