टीम AM : बीड – कल्याण महामार्गावर डोंगर किनी नजीक असलेल्या जातनांदूर घोडेवाडी या ठिकाणी आयशर टेम्पो आणि स्कॉर्पियो गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
जातनांदूर नजीक असलेल्या घोडेवाडी या ठिकाणी बीडहून नगरकडे निघालेला आयशर टेम्पो आणि नगरहून गेवराईकडे निघालेली स्कॉर्पियो यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात एका महिलेचा समावेश आहे.
सर्व मृत हे गेवराई तालुक्यातील मारफळा या गावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.