जूनमध्ये बजेट ट्रिप करायची आहे ? : ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वोत्तम

टीम AM : जूनचा महिना सुरु झाला आहे. जूनच्या सुरुवातीला या भारतातील बहुतांश राज्यामध्ये आणि शहरांमध्ये तापमान वाढते. उष्णता कमालीची जाणवू लागते. या नंतर मात्र पावसाची चाहूल लागते आणि वातावरण आल्हादायक होते. अशा वातावरणात कुठेतरी फिरायला जावंस वाटतं. अशा स्थितीत अशा ठिकाणी फिरायला जा, जेथे तापमान कमी असेल आणि पावसात फिरणे सोपे जाईल. मुले, कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासह जून महिन्यातील सर्वोत्तम प्रवासाची ठिकाणे जाणून घेऊयात.

दार्जीलिंग

जून महिन्यात दार्जिलिंगला जाता येते. टायगर हिल्स, पीस पॅगोडा, बौद्ध तीर्थक्षेत्र, प्रसिद्ध मठ, बटासिया लूप, गोरखा वॉर मेमोरियल इत्यादी अनेक सुंदर पर्यटन स्थळे येथे आहेत. तुम्ही दार्जिलिंगमध्ये टॉय ट्रेनचा आनंद घेऊ शकता. कमी पैशात तुम्ही दार्जिलिंग ट्रिपमध्ये आरामशीर सुट्टी घालवू शकता.

इंदूरचे धबधबे

उन्हाळ्यात इंदूरला जाता येते. इंदूरमध्ये अनेक सुंदर धबधबे आहेत. उन्हाळ्यात थंडावा अनुभवण्यासाठी इंदूरच्या धबधब्याच्या आसपास सहलीला जाता येते. मोहाडी धबधबा हा इंदूरमधील सर्वात प्रसिद्ध धबधब्यांपैकी एक आहे. हे ठिकाण गर्दीपासून दूर आहे. याशिवाय पातालपाणी धबधबा आणि बामनिया कुंड फॉल्सलाही भेट देता येईल.

हिमाचल प्रदेशातील हिल स्टेशन्स

जून महिन्यात तुम्ही हिमाचल प्रदेशच्या हिल स्टेशनला सुट्टी घालवण्यासाठी जाऊ शकता. नैसर्गिक सौंदर्यात रोमांचक प्रवास आणि थंड हवेत सुट्टी साजरी करू शकता. कासोल, मनाली, लॅन्सडाउन आणि धर्मशाला यासह अनेक हिल स्टेशन्स आहेत, ज्यांना भेट देण्यासाठी कमी पैसे लागतील.

माउंट अबू

जर तुम्हाला उत्तर भारतातील हिल स्टेशन्सपेक्षा वेगळे कुठेतरी भेट द्यायची असेल तर तुम्ही राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन माउंट अबूला भेट देऊ शकता. माउंट अबू हे ग्रॅनाइटने बनवलेले शिखर आहे, जिथून सर्व बाजूंनी वन्यजीव अभयारण्याचे दृश्य दिसते.