टीम AM : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितसाठी आज खूप खास दिवस आहे. माधुरी आज तिचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. आजही लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या माधुरीचा जन्म 15 मे 1965 रोजी मुंबईत झाला. लहानपणी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारी माधुरी मात्र पुढे जाऊन बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री बनली.
1984 मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केलेल्या माधुरीनं अनेक हिट सिनेमात काम केलं. 90 च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षित चर्चेत राहिली. हिच माधुरी दीक्षित अभिनेत्रीसह एक उत्तम बिझनेस वुमन देखील आहे. इतकंच काय तर तिनं एक गाव देखील दत्तक घेतलं आहे. अभिनेत्रीची संपत्ती तरी किती आहे पाहूयात.
माधुरी दीक्षितनं 1985 मध्ये ‘अबोध’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुरूवातीचे काही सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर 1988 मध्ये आलेल्या ‘तेजाब’ सिनेमानं माधुरीला एका रात्री स्टार बनवलं. त्यानंतर आलेल्या ‘दयावान’, ‘दिल’, ‘खलनायक’, ‘साजन’, ‘बेटा’, ‘हम आपके हैं कौन’ सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमातून माधुरी दीक्षित हे नाव घराघरात पोहोचलं. 2002 पासून माधुरीनं बॉलिवूडमधून छोटा ब्रेक घेऊन 2007 मध्ये ‘आजा नचले’ मधून कमबॅक केलं.
माधुरीची ऑनलाइन डान्स अकॅडमी आहे. डान्स विथ माधुरी असं त्याचं नाव आहे. यातून माधुरी एक्स्ट्रा इनकम मिळवते. त्याचप्रमाणे RNM Moving Pictures या कंपनीची ती को – फाउंडर आहे. या प्रोडक्शन कंपनीची सुरूवात तिचा पती श्रीराम नेने यांनी केली. तसंच माधुरीनं एका स्टर्टअप कंपनीची घोषणा केली आहे. फिटनेस टेक्ल्नॉडजीसाठी ही कंपनी सुरू करण्यात येणार आहे.
एका रिपोर्टनूसार माधुरी दीक्षित जवळपास 250 कोटींची मालकीण आहे. ती वर्षाला 12 कोटी रूपये कमावते. सिनेमांबरोबरच ती अनेक ब्रँडचं प्रमोशन करते. अनेक जाहिरातीत काम करते. यातून तिला लाखो रूपये मिळतात. त्याचप्रमाणे माधुरी अनेक शो देखील जज करते. एक रिअलिटी शो जज करण्यासाठी माधुरी 25 कोटी रूपये घेते.
माधूरी दिक्षित एका जाहिरातीसाठी 8 कोटी रुपये घेते. तर एका सिनेमासाठी 4 – 5 कोटी रुपये मानधन आकारते. माधुरीनं महाराष्ट्रातील एक गाव देखील दत्तक घेतलं आहे. अनेक महत्त्वाच्या दिवशी ती त्या गावात जाऊन गावकऱ्यांची भेट घेत असते. त्यांच्या समस्या जाणून घेते. माधुरी दीक्षितला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.