भुवनेश्वर येथे 10 मार्च पासून सुरू होणार स्पर्धा
अंबाजोगाई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद महिला क्रिकेट संघात येथील स्वाती पाटील, सावली (रुचा) सरवदे, पूजा ताजने, प्रियंका गित्ते, सुरेखा आडे यांची निवड झाली असून सदरील वेस्ट झोन स्पर्धा भुवनेश्वर (उडीसा) या ठिकाणी 10 मार्च पासून सुरू होणार आहे.
स्वाती पाटील, सुरेखा आडे यांची दुसऱ्यांदा विद्यापीठ संघात निवड झाली आहे तर प्रियंका गित्ते हिची चौथ्यांदा विद्यापीठ संघात निवड झाली आहे. तसेच सावली (रुचा) सरवदे, पूजा ताजने प्रथमच विद्यापीठ संघात खेळत आहेत. स्वाती पाटील, प्रियंका गित्ते, पूजा ताजने, सुरेखा आडे या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयमध्ये शिक्षण घेत आहेत तर सावली सरवदे योगेश्वरी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
या सर्व खेळाडूंना माही परमार, मोहीत परमार, स्वप्निल कोकाटे व प्राध्यापक भारत पल्लेवार, प्रा. सारीका जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हे सर्व खेळाडू अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतात. सदरील स्पर्धेसाठी यो. शि. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे, दत्तात्रय पाटील, डॉ. नरेंद्र काळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट, उपप्राचार्य डॉ. रमेश शिंदे, प्रताप जाधव तर आनंद कर्णावट, संतोष कदम, शुभम लखेरा, घोडके मामा, हरिष रुपडा, राजेंद्र देशपांडे, डॉ. असद जानूल्ला, विनोद गगने, अजित लोमटे, अविनाश साठे यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.