विवाह सोहळ्यातून घडले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन : रोटरीच्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
अंबाजोगाई : रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनी सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात सर्वधर्मीय पाच जोडप्यांचे शुभमंगल झाले. या सर्व जोडप्यांना संसार उपयोगी वस्तुंचे वाटपही रोटरीच्या वतीने करण्यात आले. अनेक मान्यवरांनी या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले.
रोटरी क्लबच्या वतीने परिचय मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या विवाह सोहळ्यात एक हिंदु, एक बौद्ध तर तीन मुस्लीम जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले. समाजातील उपेक्षितांच्या पाठीशी रोटरी आहे. या उद्देशाने या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्था व शिस्तीत विद्युत रोषणाई व बँन्ड पथकाच्या धुमडधाक्यात हा विवाह सोहळा संपन्न झाला.
या विवाह सोहळ्यासाठी रोटरीचे प्रांतपाल रूक्मेश जाखोटिया, उपप्रांतपाल उमाकांत थोरात, भाजपाचे युवानेते अक्षय मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आ. संजय दौंड, पृथ्वीराज साठे, उद्योजक प्रदिप ठोंबरे, वक्त बोर्डाचे सदस्य समीर काझी, रोटरी क्लबचे दादा साळुंके, दिपक पोकळे, व्यंकटेश चन्ना, हरिष मोठवाणी, रोटरीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्यासह रोटरीचे अध्यक्ष शेख मोईन, सचिव भिमाशंकर शिंदे, प्रकल्प संचालक प्रा. संतोष मोहिते, कल्याण काळे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष मोईन शेख यांनी केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी सर्वधर्मिक विवाहाची संकल्पना स्पष्ट केली. रोटरी क्लबचे प्रांतपाल रूक्मेश जाखोटीया यांनी वधु – वरांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बोलताना जाखोटीया म्हणाले की, अंबाजोगाई रोटरी क्लबने सर्वधर्मिय विवाह सोहळा साकार करून समाजाला नवी दिशा दिली. मोईन शेख व त्यांचे सहकारी यांचे कार्य उल्लेखनिय असल्याचे त्यांनी सांगितले.
रोटरी क्लबने आयोजित केलेल्या या विवाह सोहळ्यात सर्वधर्मीयांचे विधी व सर्वसोपास्कार त्या – त्या धर्माप्रमाणे केले. उत्तम भोजन व्यवस्था व नियोजनबद्ध व्यवस्थापन यामुळे हा अनोखा विवाह सोहळा अंबाजोगाईकरांसाठी कौतुकाचा विषय ठरला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरीचे अध्यक्ष शेख मोईन, भिमाशंकर शिंदे, सदस्य संतोष मोहिते, आनंद कर्नावट, धनराज सोळंकी, राजेंद्र घोडके, अंगद कराड, प्रविण चोकडा, हर्ष वडमारे, कल्याण काळे, डॉ. नवनाथ घुगे, गोरख मुंडे, स्वप्नील परदेशी, प्रदीप झरकर, गणेश राऊत, रुपेश रामावत, ओनकेश दहिफळे, डॉ. अनिल केंद्रे, डॉ. संजय शेटे, आनंद जाजू, डॉ. अतुल शिंदे, सुहास काटे, सारंग पुजारी यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.