फिल्टरपाड्याच्या बच्चनचा आज वाढदिवस, समीर चौघुलेंनी गौरवसाठी लिहिली खास पोस्ट

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता गौरव मोरे हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचला. गौरव फिल्टरपाड्याचा बच्चन या नावानं लोकप्रिय आहे. गौरवचं अफलातून विनोदाचं टायमिंग, अभिनय यामुळे तो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाला.

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गौरव मोरेचा आज वाढदिवस. त्याच्या वाढदिवसा निमित्तानं महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील त्याचा सहकलाकार आणि प्रसिद्ध अभिनेते समीर चौघुले यांनी गौरवसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

ही पोस्ट शेअर करताना समीर यांनी गौरवचा हास्यजत्रेच्या सेटवरील एक फोटो शेअर केला. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गौरव देविदास मोरे. भावा… तू तो अपना शेर है. तुझ्याबद्दल मी काय लिहिणार. अत्यंत वेगळी विनोदाची शैली असलेला आमचा गौऱ्या अल्पावधीतच जगातल्या मराठी माणसांच्या गळ्यातला ताईत झाला. गौऱ्याचे आबाल वृद्ध फॅन आहेत यातच त्याची मेहनत आणि कामावरील प्रेम दिसून येतं. तुझ्यातली उत्स्फूर्तता आणि तुझ्यावर रसिकांचं प्रेम असंच कायम राहो आणि तुला जे जे आयुष्याकडून हवंय ते दुपटीने मिळो. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.. 

सौजन्य : राजश्री मराठी..

‘समीर यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर गौरवने ‘दादा लव्ह यू’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हास्यजत्रेतून प्रसिद्धी मिळवलेल्या गौरवनं मराठी सिनेमांतूनही स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. गौरवनं ‘हवाहवाई’ सिनेमात काम केलं आहे. हास्यजत्रेच्या टीमनं दुबई दौरा केला. त्या दौऱ्यामध्ये गौरवची लोकप्रियता दिसून आली. त्या दौऱ्याचे काही फोटो गौरवनं सोशल मीडियावर शेअर केले होते.