मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कै. आण्णासाहेब पाटील यांना अभिवादन

अंबाजोगाई : अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, माथाडी कामगारांचे आराध्य दैवत व मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलीदान देणारे कै.आ.आण्णासाहेब पाटील यांना त्यांच्या 86 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

अंबाजोगाई शहरातील आण्णासाहेब पाटील चौकातील नामफलकाला पुष्पहार अर्पण करून अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राणा चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुनिल व्यवहारे, दिनेश घोडके, सुधाकर टेकाळे, खंडु टेमकर, अशोक देवकर, अनिल औचित्ये, जावेद गवळी, अजिम जरगर, भास्कर निर्मळ, संजय पांडे, विजयकुमार गंगणे, किरण पाखरे, कृष्णा जगताप आदींसहीत मान्यवर उपस्थित होते.

माथाडी कामगारांसाठी आयुष्य समर्पित केले – राजकिशोर मोदी

अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठा आरक्षण लढ्याचे जनक म्हणुन ओळखले जाणारे कै.आण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांचे कार्य महाराष्ट्र कदापीही विसरणार नाही. आरक्षणासाठी व माथाडी कामगारांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे आग्रणी नेते म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते. जयंती दिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.