विजेचा शॉक लागल्याने एकाचा मृत्यू : नागसेननगर भागात घडली घटना

अंबाजोगाई : पाणी भरण्यासाठी मोटार लावताना विजेचा शॉक लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील नागसेननगर भागात आज दिनांक 11 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास घडली आहे. 

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव कलीम तांबोळी असं आहे. या घटनेमुळे नागसेननगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अंबाजोगाई शहरातील ‌‌वीज पुरवठ्याचं आणि पाणी पुरवठ्याचं संपूर्ण नियोजन कोलमडले असून या दोन्ही विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, अंबाजोगाई शहरात पाणी भरताना विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची ही 8 दिवसातील दुसरी घटना आहे. अंबाजोगाईत सध्या पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे विद्युत उपकरणांचा वापर करताना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌