अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात सर्वप्रथम शिवसेनेची शाखा अंबाजोगाईत स्थापन करणारे कै. वसंत अप्पा पोखरकर यांचे पुतणे तथा तालुक्यातील युवा नेतृत्व विनोद पोखरकर यांनी दिनांक २२ सप्टेंबर रविवार रोजी ना. जयदत्त क्षीरसागर, शिवसेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख चंद्रकांत खैरे, नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर, शिवसेना जिल्हाअध्यक्ष सचिन मुळूक, बाळासाहेब पिंगळे, डॉ. योगेश क्षीरसागर, अनिल जगताप, विलास शिंदे, माजी मंत्री बदामराव पंडीत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात पोखरकर यांनी प्रवेश केला. या मेळाव्यासाठी सर्व ठिकाणांहुन मोठ्या संख्येने कार्यकर्ते आलेले होते. अंबाजोगाई तालुक्यातुनही असंख्य कार्यकर्तांची उपस्थिती होती.
विनोद पोखरकर यांच्या प्रवेशामुळे अंबाजोगाई शहराबरोबरचं बीड जिल्हयाला एक आठवण आल्याशिवाय राहत नाही, ती म्हणजे कै. वसंत अप्पा पोखरकर या शिवसैनिकाची. आज बीड जिल्ह्यात ज्यांनी शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली, असा त्यांचा आदर्श आहे. विनोद पोखरकर यांच्या प्रवेशावेळी शिवसेना अंबाजोगाई तालुकाप्रमुख वाघमारे, शहरप्रमुख गजानन मुडेगावकर, अशोक गाढवे, गणेश जाधव, विशाल घोबाळे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कै. वसंत अप्पा पोखरकर यांचा सर्वांनी केला विशेष उल्लेख
माजी खासदार चंद्रकांत खैरे, ना. जयदत्त क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष सचिन मुळुक, माजीमंत्री बंदामराव पंडीत, माजी जिल्हाध्यक्ष अनिल जगताप सर्व मान्यवरांनी कै.वसंत अप्पा पोखरकर यांच्या नावाचा विशेष उल्लेख भाषणात करुन सांगितले की, शिवसेनेची बीड जिल्ह्यात पहिली शाखा अंबाजोगाईत स्थापन करणारे अप्पा. आज त्यांच्या पुतण्यानेही शिवसेनेत प्रवेश केला म्हणजे आजही शिवसेना बीड जिल्ह्यात टिकून आहे हे ह्याचे उदाहरण आहे.