बीड : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार रविवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दि. 31 जुलै 2022 रोजी सकाळी 8.20 वाजता आ. धनंजय मुंडे यांचे निवासस्थान, परळी, जि. बीड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.00 वाजता वैद्यनाथ मंदिर, परळी येथे आगमन व राखीव. सकाळी 10.00 वाजता जवळगाव ता. अंबाजोगाई येथे आगमन, सकाळी 10.15 वाजता. अंबाजोगाई तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी. सकाळी 11.45 वाजता बेलुरा ता. माजलगाव येथे आगमन व माजलगाव तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी. दुपारी 12.30 वाजता मोटारीने चिंचोली ता. वडवणी येथे आगमन व वडवणी तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी.
दुपारी 1.00 वाजता मोटारीने वडवणी येथे आगमन व राखीव. दुपारी 2.00 वाजता मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आगमन व बीड जिल्ह्यातील पीक परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे चर्चा. दुपारी 2.45 वाजता शासकीय विश्रामगृह, बीड येथे आगमन, पत्रकार परिषद व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी राखीव. सायं. 4.00 मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण.