ऐतिहासिक बुरुजावर झेंडावंदन करणार‌ : मराठवाडा जनता विकास परिषदेचा पुढाकार

अंबाजोगाई : देशाच्या स्वातंत्र्याबरोबर हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या विजयाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. येत्या 17 सप्टेंबरला सकाळी येथील खोलेश्वर मंदिरा जवळील ऐतिहासिक बुरुजावर तिरंगा ध्वज फडकावून ध्वजावंदन समारंभ करण्याचा निर्धार मराठवाडा जनता विकास परिषदेच्या बैठकीत करण्यात आला आहे. 

नवीन रेल्वे मार्गाची मागणी 

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने घाटनांदूर – अंबाजोगाई , घाटनांदूर – दौंड आणि इतर नवीन रेल्वे मार्गाची मागणी करण्यात येणार आहे. या मागणीचे निवेदन रल्वे मंत्री, राज्य रेल्वे मंत्री, खासदार, आयुक्त आणि इतरांना देण्याचे बैठकीत ठरले.

या प्रसंगी डॉ. नरेंद्र काळे, निवृत्त प्राचार्य डॉ. दामोधर थोरात‌, प्रा. रमेश सोनवळकर, ॲड. अनंतराव जगतकर, निवृत्त प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, डॉ. वनमाला रेड्डी, एस. के. निर्मळे, सुहास काटे, राजू साळवी, विवेक गंगणे, संतराम कराड, शिवाजी खोगरे, जगदीश जाजू, विशाल आकाते, मधुकर बाभूळगावकर, काचगुंडे यांची उपस्थिती होती.