मुंबई : उद्या 17 जूनला दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. निकालासंदर्भात ट्विट करत शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थीनींनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले होते.
मंडळाकडून 20 जूनपर्यंत निकाल जाहीर होईल, असे सांगण्यात आले होते आणि त्यानुसार उद्या म्हणजे 17 जूनला दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होईल.