जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत चोरी : 72 हजार रूपयांचे साहित्य लंपास

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

अंबाजोगाई : शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील 72 हजार रूपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दिनांक 2 एप्रिलला प्राप्त झाली आहे. ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌

या बाबत प्राप्त माहिती अशी की, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतून 72 हजार रूपयांच्या साहित्याची चोरी झाली आहे. यात 45 हजार रुपये किमतीच्या 15 खिडक्या, 12 हजार रुपये किमतीचे 6 दरवाजे, 15 हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य, यातील चोरी झालेल्या साहित्याची सर्व किंमत अंदाजित आहे. 

या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक बळीराम जोगदंड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हे. कॉ. नागरगोजे करित आहेत.