एकदिवसीय केले धरणे आंदोलन : असंख्य कार्यकर्ते सहभागी
अंबाजोगाई : नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी गोरगरिब बेघरासांठी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजनेची अंमलबजावणी केली नसल्याच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चौकापासून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यात वंचित बहुजन आघाडीचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अंबाजोगाई शहरातील बहुतांश वस्त्या या भोगवट्यात असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांपासून शहरातील गोरगरिबांना वंचित राहावे लागत आहे. भोगवट्यात असल्याने पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजनांची अंमलबजावणी शहरात प्रभावीपणे झालीच नाही. त्यामुळे शहरातील असंख्य भोगवटाधारकांना घरकुलं मिळाली नाहीत.
नगरपरिषद प्रशासनाने तांत्रिक अडचणी दाखवून गोरगरिबांना आपल्या हक्काच्या योजनेपासून ‘वंचित’ ठेवले. अंबाजोगाईतील भोगवटाधारकांची नोंद मालकी हक्कात घेऊन त्यांना पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, यासह अन्य मागण्यांबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज दिनांक 31 मार्चला करण्यात आलेल्या आंदोलनात बीड जिल्हा अध्यक्ष (पूर्व) शैलेश कांबळे, जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, अरुण बनसोडे, बळीराम सोनवणे, परमेश्वर जोगदंड, अमोल जोगदंड, उमेश शिंदे, भारत गायकवाड, जीवन शिनगारे, सुशांत धावरे, तालुकाध्यक्ष खाजामिया पठाण, शहराध्यक्ष गोविंद मस्के, नितीन सरवदे, आशाबाई जोगदंड, पद्मिनबाई मस्के, मुद्रिका सरवदे, जोगदंड मावशी, तालुका महासचिव राहुल कासारे, सतिश सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष डी. के. कांबळे, खंडू जाधव, एकनाथ सुरवसे, शिवाजी दहिवाडे, लखन बलाढे, तुकाराम देवळकर, चांद पाशा शेख, शिलानंद पाचपिंडे, सुमित पाचपिंडे, कृष्णा कांबळे, तेजस गंडले यांच्यासह आदी कार्यकर्ते, भोगवटाधारक सहभागी झाले होते.