चांदापूर येथे 13 फेब्रुवारीला आठव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन

धम्म परिषदेेचे ‘सम्यक संकल्प’ या पेजवरून फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यात येणार – स्वागताध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर 

अंबाजोगाई : परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही 13 फेब्रुवारी 2022 रोजी आठव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेला पुज्य भदन्त उपगुप्त महाथेरो (पुर्णा), पुज्य भिक्खू महाविरो (काळेगाव, अहमदपूर), पुज्य भिक्खू पय्यानंद (लातूर), पुज्य भिक्खू धम्मशील (हिंगोली/बीड) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी, चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. कोविड पार्श्वभूमीवर प्रतिबंध लागू असल्यामुळे प्रशासनाकडून उपस्थित राहण्यासाठी कमीत कमी व्यक्तींनाच परवानगी आहे. त्यामुळे धम्म परिषदेला फार गर्दी करता येणार नाही. उपासकांची गैरसोय होवू नये, यासाठी या धम्म परिषदेेचे ‘सम्यक संकल्प’ या पेजवरून फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याचा लाभ धम्म उपासकांनी घ्यावा असे आवाहन स्वागताध्यक्ष इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले आहे.

आठव्या बौद्ध धम्म परिषदेची सुरूवात सकाळी 10 वाजता पंचरंगी धम्म ध्वजारोहणाने होईल. या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनीचे अध्यक्ष ॲड. अनंतराव जगतकर हे असणार आहेत तर यावेळी आ. संजय दौंड यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. प्रदीप रोडे, नालंदा अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर वडमारे, माजी नगरसेवक प्रा. डॉ. विनोद जगतकर यांची उपस्थिती लाभणार आहे.

ज्या उपासकांना धम्म परिषदेला उपस्थित रहावयाचे आहे. त्यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या सर्व निर्देशांचे व जिल्हाधिकारी, बीड यांच्या आदेशानूसार पालन करून तसेच कोविड – 19 लसीकरणाचे दोन्ही डोस पुर्ण केलेले असावेत, तसे प्रमाणपत्र किंवा पुरावा सोबत ठेवावा आणि सर्वांनी पांढरे वस्त्र परिधान करूनच धम्म उपासकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

धम्म परिषदेच्या यशस्वितेसाठी तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवन (ता.परळी वै.जि.बीड) चे पदाधिकारी चंद्रकांत इंगळे, राजेंद्र घोडके, प्रा. गौतम गायकवाड, राहुल घोडके, जगन सरवदे, सचिन वाघमारे, विश्वनाथ भालेराव, सिमा चंद्रकांत इंगळे आणि संयोजन समितीचे बौद्धाचार्य मुरलीधर, सुभाष वाघमारे, माणिक रोडे, मधुकर वेडे, व्यंकट वाघमारे, मिलींद नरबागे, राज जगतकर, प्रा. बी. एस. बनसोडे, किशोर इंगळे, चंद्रकांत बनसोडे, संजय साळवे (पुस), सुरेखा रोडे, अर्जुन काळे, आकाश वेडे, विनोद रोडे, धनंजय जोगदंड, सुशिल इंगळे, शिलाताई जोगदंड, रूक्मीण गोरे, बुद्धकरण जोगदंड, संजय जोगदंड संजय सिंगणकर, सुहासिनी इंगळे, स्वप्नील रोडे, बंडू इंगळे, विजय हजारे, धम्मानंद मस्के तर प्रसिध्दी प्रमुख प्रा‌. बालाजी जगतकर आदींनी पुढाकार घेतला आहे.