अंबाजोगाई तालुक्यात 30 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामांचे सोमवारी भूमिपूजन

ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार भुमिपूजन

कोविड नियमावलीला अनुसरून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार भूमीपूजन

अंबाजोगाई : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते विकास कामांचा धडाका सुरू आहे. अंबाजोगाई तालुक्यातील 15 गावांना प्रमुख मार्गांशी जोडणार्‍या सुमारे 30 कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) सकाळी 9 वाजल्यापासून भूमिपूजन होणार आहे. 

यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील राज्य मार्ग 56 ते मुरकूटवाडी रस्ता, मुरकूटवाडी येथे सकाळी 9 वा., प्रजिमा 57 ते भतानवाडी, सकाळी 10 वा., राज्य मार्ग 232 ते कांदेवाडी, कांदेवाडी येथे सकाळी 10.30 वा., राज्य मार्ग 221 ते घोलट वस्ती, पट्टीवडगाव येथे सकाळी 11.30 वा., रा.मा. 56 ते हनुमानवाडी रस्ता, हनुमानवाडी येथे दुपारी 12.30 वा., रा.मा. 233 ते भवानवाडी रस्ता, घोलटवस्ती येथे दुपारी 01 वा., जवळगाव ते मुरंबी रस्ता, जवळगाव येथे दुपारी 02 वा, रा.मा. 56 ते जवळगाव रस्ता, गिरवली पाटी येथे दुपारी 03 वा., रा.मा. 56 ते सेलूअंबा रस्ता, तथागत चौक, अंबाजोगाई येथे दुपारी 04 वा., रा.मा. 56 ते वाघाळा रस्ता, योगेश्वरी नगरी, अंबाजोगाई येथे दुपारी 04.30 वा., धानोरा बु. ते वांगदरी रस्ता, धानोरा बु. येथे सायंकाळी 05.30 वा., प्रजिमा – 57 ते सुगांव – राडी रस्ता व इजिमा – 1 ते दैठणा राडी रस्ता, राडी येथे सायंकाळी 06.30 वा., रा.मा.232 ते मुडेगाव रस्ता, सेलूअंबा येथे सायंकाळी 07.30 वा. आणि प्रजिमा – 57 ते चव्हाण वस्ती रस्ता, नांदगाव येथे रात्रौ 08 वा. या रस्त्यांच्या कामांचे भूमिपुजन होणार आहे. 

मुख्यमंत्री ग्रामसडक येाजनेच्या अंतर्गत राज्यभरात सुमारे 10 हजार कि.मी. रस्त्यांची विकास कामे हाती घेण्यात आली असून, त्यातून जास्तीत जास्त रस्त्यांची कामे बीड जिल्ह्यात पूर्ण केली जावीत, यासाठी ना. धनंजय मुंडे हे प्रयत्नशील आहेत. सद्या बीड जिल्ह्यात लागू असलेल्या कोविड विषयक निर्बंधांना अनुसरून ना. मुंडे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, विधान परिषद सदस्य आ. संजय दौंड यांसह मोजक्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत हे भूमिपुजन कार्यक्रम होणार असल्याचे आयोजकांच्या वतीने कळवण्यात आले आहे.