अजित पवार अनंतात विलीन : दादांना अखेरचा निरोप देताना महाराष्ट्र हळहळला…!

टीम AM : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी सकाळी बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान झालेल्या भीषण विमान अपघातात त्यांचे अकाली निधन झाले होते. 

आज सकाळी त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली, ज्यामध्ये जनसागराचा महापूर लोटला होता. अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि पार्थ पवार यांनी जड अंतःकरणाने आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. 

या प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील आणि राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. प्रशासकीय शिस्तीचे भोक्ते आणि लोकनेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अजितदादां’ च्या अशा अनपेक्षित जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here